मुख्य सामग्रीवर वगळा

मा.नरेंद्र मोदी विचार मंच च्या वतीने शामगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मा.नरेंद्र मोदी विचार मंच च्या वतीने शामगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.



मा.नरेंद्र मोदी विचार मंच , भारत राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष गुरुवर्य श्री.वासुदेव शर्मा साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार , प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.संजय घार्गे सर यांच्या शुभ हस्ते शामगाव , ता.कराड ,जि.सातारा येथे  आज महावृक्षा रोपण करण्यात आले. लावलेल्या वृक्षांची देखभाल पर्यावरण विभाग घेणार आहे.या कार्यक्रमला    सातारा उपजिल्हा अध्यक्ष सुरज पाटोळे , कराड ता.अध्यक्ष ,अभिजीत साळुंखे , खटाव ता.अध्यक्ष  श्री.विशाल पाटोळे , कोरेगांव ता.अध्यक्ष श्री.गुरव ,बँक शाखा अध्यक्ष श्री.प्रल्हाद रावले , मा.सरपंच वडगांव ज.स्वा.श्री.अरविंद घार्गे , श्री.पिसे , वनपाल श्री.भाऊसाहेब सुतार , वन समिती अध्यक्ष , शामगाव श्री.अप्पा पोळ , श्री.सुहास शिंदे, संभाजी मदने,प्रसार माध्यम प्रमुख , खटाव ता. श्री.धनंजय घार्गे  ई.मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड:शेतकरी दूध उत्पादक संघटनेचा स्वाभिमानाच्या आंदोलनाला उंब्रज येथील बैठकीत जाहीर पाठिंबा.

कराड:शेतकरी दूध उत्पादक संघटनेचा स्वाभिमानाच्या आंदोलनाला उंब्रज येथील बैठकीत जाहीर पाठिंबा. कॅप्टन इंद्रजित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंब्रज येथील आर्मी हाऊस येथे दूध उत्पादक शेतकऱयांची बैठक आयोजित केलेली होती. तसेच कराड तालुक्यातील ९ दुधसंघांना निवेदन देण्यात आले. यात कोयना दुध संघाचा हि समावेश आहे. या बैठकीत  बोलताना स्वाभीमानीचे जिल्याध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले, खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे, घामाचे दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानाने हा लढा उभा केला आहे. प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे सरकार शेतकरी विरोधी असून डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध भूकटीला अनुदान देऊन काही भुकटी तयार करणाऱ्या मोठया व्यावसाईक लोकांची घरे भरत आहे .  महाराष्ट्रातून दूध निर्यात होत नसताना दूध निर्यातीसाठी 5 रुपये अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना पाकिस्तानातून आल्या सारखी वागणूक देणाऱ्या या सरकारला शांततेची  भाषा कळत नसेल तर आम्ही ही छ. शिवाजी महारा...

साईबाबांचे मतदारयादीत नाव ; खोळसाडपणा करणा-या अज्ञातावर गुन्हा दाखल

साईबाबांचे मतदारयादीत नाव ; खोळसाडपणा करणा-या अज्ञातावर गुन्हा दाखल राहता - निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन अँपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना या वर्षीच्या सुरुवातीला घडली असून या प्रकरणी नायब तहसिलदार सचिन म्हस्के यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मंगळवारी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब) (क) नुसार अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०१८ रोजी शिर्डी विधानसभा मतदार संघ यादीत ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करून शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर 6 भरला होता. यासाठी पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता. छाणणी करीत असताना हा प्रकार निवडणूक आधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच वेळी राहाता पोलिसांना या बाबत कळविले होते. सदर गुन्हा सायबर क्राईम असल्याने पोलिसांनी नगरला तक्रार करण्यास सांगितले. सायबर सेलकडे गेले असता त्यां...