मुख्य सामग्रीवर वगळा

कराड:शेतकरी दूध उत्पादक संघटनेचा स्वाभिमानाच्या आंदोलनाला उंब्रज येथील बैठकीत जाहीर पाठिंबा.

कराड:शेतकरी दूध उत्पादक संघटनेचा स्वाभिमानाच्या आंदोलनाला उंब्रज येथील बैठकीत जाहीर पाठिंबा.




कॅप्टन इंद्रजित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उंब्रज येथील आर्मी हाऊस येथे दूध उत्पादक शेतकऱयांची बैठक आयोजित केलेली होती. तसेच कराड तालुक्यातील ९ दुधसंघांना निवेदन देण्यात आले. यात कोयना दुध संघाचा हि समावेश आहे.
या बैठकीत  बोलताना स्वाभीमानीचे जिल्याध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले, खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे, घामाचे दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानाने हा लढा उभा केला आहे. प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे सरकार शेतकरी विरोधी असून डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध भूकटीला अनुदान देऊन काही भुकटी तयार करणाऱ्या मोठया व्यावसाईक लोकांची घरे भरत आहे.  महाराष्ट्रातून दूध निर्यात होत नसताना दूध निर्यातीसाठी 5 रुपये अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना पाकिस्तानातून आल्या सारखी वागणूक देणाऱ्या या सरकारला शांततेची  भाषा कळत नसेल तर आम्ही ही छ. शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे दाखवून द्यावे लागेल
यावेळी कॅप्टन इंद्रजित जाधव यांनी स्वाभिमानाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय सहभागी होण्याचे आश्वासन दिले. तसेंच बोलताना म्हणाले दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध दर वाढीसाठी आम्ही नेहमी प्रयत्नशिल आहोत यासाठी उंब्रज येथे आंदोलन करण्यात आले परंतु सरकार या गोष्टी गांभीर्याने न घेता दुधाचे दर कमी झाले. यामुळेच आत्ता ही आरपार ची लढाई आपणास लढावी लागणार आहे. यासाठी आपण सर्वांनी आपले दूध डेअरी ला न घालण्याचे ठरवले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत असते त्यांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा। यावेळी प्रगतशील शेतकरी विजय पाटील,लालासो यादव,यांनीही मनोगत व्यक्त केली.
यावेळी उंब्रज पाटण भागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये युवक शेतकऱ्यांनचा सहभाग लक्षणीय होता.या वेळी
सचिन नलवडे, अनिल घराळ, कॅप्टन इंद्रजित जाधव,विजय पाटील,अजय माने,लालासो यादव, शैलेश यादव, रुपेश पवार,अनिकेत पवार,सचिन अर्जुगडे,कृष्णा क्षिरसागर,इत्यादी उपस्थित होते.


टिप्पण्या

  1. Lucky Club Casino site | LuckyClub.live
    Lucky Club Casino luckyclub offers players an incredible range of casino games: slots, poker, blackjack, roulette, live dealer and live dealer tables. There are also

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

...मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार --- संभाजी ब्रिगेड

.. .मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार ---संभाजी ब्रिगेड  राज्य सरकारने मराठा व धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. समाजाची फसवणूक केली. सरकार सतत आंदोलने फोडण्याचे सतत प्रयत्न करते. मंत्री तर फोडण्यासाठी मुख्यमंत्री वापरतात. म्हणून *परळी... मध्ये 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच...'* या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे... या आंदोलनास *'पाठींबा'* देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड पुणे शहर जिल्हाच्या  वतीने  या सरकार विरोधात निदर्शने करून मराठा समाजाच्या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात. तसेच परळी येथील आंदोलनकर्ते मराठा बांधवांना त्या ठिकाणी योग्य ते सहकार्य शासनाने करावे... यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना पुणे शहर संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले... . ..मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात अडवणार ... मराठा समाजाची सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती वर दयनीय व भयानक आहे दिवसे दिवस आत्महत्या वाढत आहेत म्हणुन राज्यात ५८ मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले. परंतु त्याच

मा.नरेंद्र मोदी विचार मंच च्या वतीने शामगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

मा.नरेंद्र मोदी विचार मंच च्या वतीने शामगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. मा.नरेंद्र मोदी विचार मंच , भारत राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष गुरुवर्य श्री.वासुदेव शर्मा साहेब यांच्या मार्गदर्शना नुसार , प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.संजय घार्गे सर यांच्या शुभ हस्ते शामगाव , ता.कराड ,जि.सातारा येथे  आज महावृक्षा रोपण करण्यात आले. लावलेल्या वृक्षांची देखभाल पर्यावरण विभाग घेणार आहे.या कार्यक्रमला    सातारा उपजिल्हा अध्यक्ष सुरज पाटोळे , कराड ता.अध्यक्ष ,अभिजीत साळुंखे , खटाव ता.अध्यक्ष  श्री.विशाल पाटोळे , कोरेगांव ता.अध्यक्ष श्री.गुरव ,बँक शाखा अध्यक्ष श्री.प्रल्हाद रावले , मा.सरपंच वडगांव ज.स्वा.श्री.अरविंद घार्गे , श्री.पिसे , वनपाल श्री.भाऊसाहेब सुतार , वन समिती अध्यक्ष , शामगाव श्री.अप्पा पोळ , श्री.सुहास शिंदे, संभाजी मदने,प्रसार माध्यम प्रमुख , खटाव ता. श्री.धनंजय घार्गे  ई.मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.